कोणत्या राशीला साडेसाती आहे. साडेसाती म्हणजे काय Konatya Rashila Sadesati ahe. Sade sati mhanje kay
कोणत्या राशीला साडेसाती सुरु आहे . धनु , मकर व कुंभ या तीन राशीना साडेसाती चालू आहे. 29 एप्रिल 2022 रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्यानंतर धनु राशी ची साडेसाती संपुन मकर , कुंभ व मीन राशीची साडेसाती चालु होईल. मुळात साडेसाती ही राशी प्रमाणे न बघता तुमचा जन्म चंद्र ज्या अंशात असेल तिथुन 45 अंश मागे शनि आल्यास साडेसाती सुरु होते व शनि 45 अंश पुढे निघुन गेल्यास साडेसाती संपते.
पंचांग कसे पाहावे
साडेसाती केंव्हा सुरु होते
साडेसाती केंव्हा सुरु होते . तुमचा जन्म चंद्र धनु 25 अंश आहे तर 25 + 45 = 70 अंश . धनु राशी चे 5 अंश + मकर राशी चे 30 अंश + कुंभ राशि चे 10 अंश असे एकूण 45 अंश पुर्ण होतात . तुमची साडेसाती शनि जेव्हां कुंभ राशीत 10 अंश जाईल तेव्हां संपेल. शनि वृश्चिक राशीत 10 अंश आल्यानंतर साडेसाती सुरु होईल . पण तुम्ही असे समजता कि वृश्चिक राशीत शनि आल्याबरोबर तुमची साडेसाती सुरु होईल पण तसे होत नाही. तुमची साडेसाती सुरु होईल जवळपास 10 महिन्यानंतर आणि संपेल शनि कुंभ राशीत 10 अंश गेल्यानंतर .
कोणत्या राशींची साडेसाती सुरु आहे .
तुम्हाला असे वाटते कि माझी जन्म रास धनु आहे व शनिने आता कुंभ राशीत प्रवेश केला आहे तर माझी साडेसाती आता संपलेली आहे पण तसे होत नाही तुमची साडेसाती संपेल जवळपास 10 महिन्यानंतर. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही कारण बऱ्याच जणाना हे माहित नसते. मी हे एक उदाहरण सांगितले आहे . रास जरी एक असेल तरी चंद्र अंश वेगळा असल्यामुळे साडेसाती वेगवेगळ्या वेळी सुरु होईल.
साडेसाती कोणत्या राशीला लागते Sade sati konatya Rashila lagate.
साडेसाती कोणत्या राशीला लागते . साडेसाती फक्त जन्म राशीलाच लागते . कारण चंद्र म्हणजे मन . साडेसातीत मनालाच जास्त त्रास होतो. साडेसातीत अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडतात. साडेसाती म्हणजे शनि जेव्हां तुमच्या राशीच्या मागील राशीत येतो तेव्हां साडेसाती सुरु होते व शनि जेव्हां पुढील राशीत जातो तेव्हां साडेसाती संपते . पण खरी साडेसाती , शनि जेव्हां तुमच्या जन्मचंद्राच्या मागे 45 अंशात येतो तेव्हां सुरु होते व शनि जेव्हां 45 अंश पुढे निघून जातो तेव्हां साडेसाती संपते . शनि एका राशीत जवळपास अडीच वर्ष राहतो , तीन राशीत मिळुन साडेसात वर्ष होतात. म्हणुन त्याला साडेसाती म्हणतात. शनिचा ,जन्म लग्नावर , जर शनि 12 व्या घरात गोचर मध्ये आला तर जास्त प्रभाव पडतो .
साडेसाती म्हणजे काय Sade sati mhanje kay
साडेसाती म्हणजे काय . लग्नस्थानी जर शनि आला तर तुमची चिकाटी वाढेल . साडेसाती प्रत्येकालाच त्रासदायक जाते असे नाही , ज्याच्या जन्म पत्रिकेत शनि 11 व्या घरात आहे त्याला साडेसातीत फार कमी त्रास होतो . 11 व्या भावात म्हणजे जन्मलग्न कूंडली प्रमाणे नाही , तर जन्मलग्न भावचलित कूंडली प्रमाणे. लग्न कूंडली व भावचलित कूंडली ही वेगळी असते. सध्या चालु असलेली महादशा व अंतरदशा व त्याच्या स्वामीचे शनीशी असलेले संबंध सुध्दा साडेसातीत प्रभाव पाडतात . शनि भावचलित पत्रिकेत ज्या भावात आहे व ज्या नक्षत्रात आहे तो नक्षत्रस्वामी ज्या भावाशी संबंधित आहे त्या भावावर नक्कीच प्रभाव पडतो .
साडेसातीत वाईटच फळे मिळतात असे नाही , चांगली फळे सुद्घा मिळतात. शनिची साडेसाती 30 वर्षात एकदा येते. ते तुमच्या 30 वर्षाच्या चांगल्या व वाईट कर्माचा हिशोब देण्यासाठी शनिला महादेवाने नेमले आहे . साडेसाती आल्यानंतर लोक जप तप करतात शनिची पूजा करतात. मला वाटते ज्या कर्मामुळे तुम्हाला साडेसातीत त्रास होत आहे ते कर्म तुम्ही करायचे टाळले पाहिजे. शनि महाराज हे न्यायाधीश आहेत ते केवळ जप केल्यामुळे समाधानी होणार नाहीत त्याबरोबर कर्म सुध्दा सुधारायला पाहिजे , साडेसातीचा त्रास लवकर कमी होईल .
कोणत्या राशीला साडेसाती सुरु आहे . कोणकोणत्या राशीला साडेसाती चालु आहे
धन्यवाद !
Lekh chan hota cangli mahiti milali dhanyavad
जवाब देंहटाएंसर मेरा नाम अनिल बगलाणे हे मुझे बहूत कठीनाईयोका सामना करना पड रहा है उपाय बताये
जवाब देंहटाएं