पंचांग कसे पहावे Panchang kase pahave

पंचांग कसे बघावे

पंचांग कसे बघावे
Panchang kase pahave पंचांग कसे पहावे ?
पंचांग म्हणजे काय panchang mhanje kay
पंचांग म्हणजे पाच अंग
1. तिथी
2. नक्षत्र
3. योग
4. करण
5. वार .
या 5 अंगाची माहिती ज्यात असते त्याला पंचांग म्हणतात . तिथी म्हणजे शुक्ल पक्षात प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत व कृष्णपक्षात प्रतिपदेपासून अमावस्यापर्यंत रोज एक जो दिवस असतो त्याला तिथी म्हणतात . हिंदु महिन्याची सुरुवात शुक्ल पक्षापासून होते. तर काही राज्यात कृष्ण पक्षापासून होते. शुक्ल पक्षातल्या पहिल्या तिथीला प्रतिपदा म्हणतात . त्यानंतर दुसऱ्या तिथीला द्वितीया , तिसऱ्या तिथीला तृतिया व शेवटच्या तिथीला पौर्णिमा म्हणतात . कृष्ण पक्षाची सुरुवात प्रतिपदेने होते . कृष्ण पक्षात दुसरी तिथी द्वितीया , तिसरी तिथी तृतिया व शेवटची तिथी अमावस्या असते . तिथी म्हणजे सुर्य व चंद्र यांच्या मध्ये 12 अंशाचे अंतर पुर्ण झाल्यावर एका तिथीची समाप्ति होते . अमावस्येला सुर्य व चंद्र एकाच राशीत व एकाच अंशात असतात. त्यानंतर चंद्र सुर्याच्या पुढे निघून जातो . ज्यावेळेस सुर्य व चंद्रामध्ये बरोबर 12 अंशाचे अंतर पुर्ण होते त्यावेळेस एक तिथी समाप्त होते . पहिल्या तिथीच्या समाप्तीच्या वेळेस सुर्य एक अंश तर चंद्र जवळपास 13 अंश असतो . त्यानंतर सुर्य परत एक अंश पुढे जातो व चंद्र सुद्धा पुढे जातो , परत ज्यावेळेस त्यांच्यामध्ये 12 अंश अंतर निर्माण होते त्यावेळेस दुसरी तिथी समाप्त होते. अशा एकूण शुक्ल पक्षात 15 तिथी असतात व कृष्ण पक्षात 15 तिथी असतात. ज्याला आपण पंधरवडा म्हणतो.
पंचांगात तिथीची समाप्ति वेळ दिलेली असते . पहिल्या तिथीची समाप्ति म्हणजेच दुसऱ्या तिथीची सुरुवात असते . पंचांगात तिथी ही सुर्योदयाला जी असते ती दिलेली असते म्हणजे सुर्योदय होताना जी तिथी सुरु असते ती दिलेली असते .
नवग्रह स्तोत्र
Panchang mahiti पंचांग माहिती
तिथी क्षय म्हणजे काय ?
नक्षत्र
नक्षत्र हे 27 असतात. चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते आपले जन्मनक्षत्र असते .समजा आपल्या जन्माच्या वेळेस चंद्र रोहिणी नक्षत्रात असेल तर आपले जन्मनक्षत्र रोहिणी असेल . पंचांगात नक्षत्राची समाप्ति वेळ दिलेली असते . एका राशी मधे सव्वादोन नक्षत्र असतात म्हणजे दोन नक्षत्र पुर्ण व एका नक्षत्राचा चौथा भाग असतो. काही राशीमधे दोन नक्षत्र पुर्ण व तिसऱ्या नक्षत्राचा पहिला भाग असतो. तर काही राशीमधे एका नक्षत्राचा शेवटचा भाग , दुसरे नक्षत्र पुर्ण व तिसऱ्या नक्षत्राचे पहिले दोन भाग असतात तर काही राशीमधे एका नक्षत्राचे शेवटचे दोन भाग , दुसरे पुर्ण नक्षत्र व तीसऱ्या नक्षत्राचे पहिले तीन भाग असतात. तर काही राशीमधे एका नक्षत्राचा चौथा भाग , दुसरे पुर्ण व तिसरे नक्षत्र पुर्ण असते . एका राशीमधे एकूण नऊ भाग असतात. नक्षत्रात एकूण चार भाग असतात. त्या भागाना चरण म्हणतात. प्रत्येक चरणाला एक नाव असते ज्याला जन्माक्षर म्हणतात , तेच आपले जन्म नाव असते . नक्षत्राच्या को़णत्या भागात म्हणजेच कोणत्या चरणात तुमचा जन्म झाला तो तुमचा जन्म चरणांक असतो व त्याचे नाव हेच तुमचे जन्मनाव असते. जसे रोहिणी नक्षत्राचे चार चरण असतात. पहिले चरण 'ओ' दुसरे चरण 'वा' तिसरे चरण 'वी' चौथे चरण 'वू' असते.
श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्र
मराठी पंचांग कसे बघावे marathi panchang kase baghave
योग
योग म्हणजे चंद्र व सुर्याच्या भोगांच्या बेरजेला योग म्हणतात . चंद्र व सुर्य यांच्या भोगांची बेरीज जर 800 कला पुर्ण झाली की, एक योग पुर्ण होतो . सुर्य रोज जवळपास 59 कला एवढे अंतर चालून जातो व चंद्र रोज जवळपास 790 कला एवढे अंतर चालून जातो , दोघांच्या चालून गेलेल्या अंतराची एकूण बेरीज जर 800 कला एवढी झाली की, एक योग पुर्ण होतो. असे सत्तावीस योग आहेत . पहिला योग विष्कंभ आहे . पंचांगात योगाची समाप्ती वेळ दिलेली असते . नक्षत्र व योगाची सुद्धा वृद्धी व क्षय होतो याचे उदाहरण तिथी मध्ये सांगितले आहे . वैधृती व व्यतिपात हे दोन योग शुभकार्यास वाईट समजले जातात . या योगावर जन्म झाल्यास शांती करावी लागते . गणिताने येणारे हे योग व अमृतसिध्दियोग हे दोन्ही वेगवेगळे आहेत . अमृतसिध्दियोग हे वार व नक्षत्र मिळुन तयार होतात .
पंचांग माहिती panchang mahiti
1. रविवार + हस्त नक्षत्र
2. सोमवार + मृगशीर्ष नक्षत्र
3. मंगळवार + अश्विनी नक्षत्र
4. बुधवार + अनुराधा नक्षत्र
5. गुरुवार + पुष्य नक्षत्र
6. शुक्रवार + रेवती नक्षत्र
7. शनिवार + रोहिणी नक्षत्र
रविवारी हस्त नक्षत्र असेल तर जो पर्यंत हस्त नक्षत्र आहे तो पर्यंत अमृतसिध्दियोग असतो . अमृतसिध्दि योग हे सर्व कार्यास शुभ असतात . गुरुवारी पुष्य नक्षत्र असेल तर जो पर्यंत पुष्य नक्षत्र आहे तो पर्यंत अमृतसिध्दियोग असतो . या योगावर सोने खरेदी करतात . तीन कार्यास तीन वर्ज्य अमृतसिध्दि योग आहेत . मंगळवारी अश्विनी नक्षत्र असेल तर गृहप्रवेश वर्ज्य करावा. गुरुवारी पुष्य नक्षत्र असेल तर विवाह व विवाहाची बोलणी वर्ज्य करावी . विवाहासाठी पुष्य नक्षत्र अशुभ आहे पण पुर्ण पौष महिना वाईट नाही. पौष महिन्यात पौर्णिमेला किंवा पौर्णिमेच्या जवळ पुष्य नक्षत्र असते. त्या नक्षत्रावरुन त्या महिन्याला पौष हे नाव पडले आहे . पौष महिन्यात विवाह व विवाहाची बोलणी करता येते . फक्त त्या दिवशी पुष्य नक्षत्र असु नये . शनिवारी रोहिणी नक्षत्र असेल तर प्रयाण वर्ज्य करावा. लांबचे प्रवास , यात्रा यांची सुरुवात या दिवशी करु नये असे शास्त्र सांगते .
पंचांग म्हणजे काय panchang mhanje kay
करण म्हणजे काय ?
करण म्हणजे तिथीचा अर्धा भाग पहिले करण पहिल्या अर्ध्या भागात असते तर दुसरे करण हे तिथीच्या दुसऱ्या अर्ध्या भागात असते असे एकूण अकरा करण आहेत त्यापैकी चार करण हे स्थिर असतात व सात करण हे चर असतात म्हणजे ते परत परत येतात . शकुनी , चतुष्पाद , नाग , किंस्तुघ्न हे चार करण स्थिर असतात . शकुनी हे कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीला दुसरे करण असते . चतुष्पाद व नाग अनुक्रमे अमावस्येला पहिले व दुसरे करण असतात . किंस्तुघ्न हे प्रतिपदेला पहिले करण असते हे बदलत नाहीत म्हणून यांना स्थिर करण म्हणतात बाकीचे सात परत परत येतात . विष्टीला भद्रा असे म्हणतात ते करण सर्व शुभकार्यास वाईट समजले जाते . या करणावर म्हणजे विष्टीकरणावर म्हणजेच भद्रावर जन्म झाला तर शांती करावी लागते . शकुनी ,चतुष्पाद , नाग हे सुद्धा वाईट समजले जातात . चतुष्पाद व नाग अमावस्येला असतात तर शकुनी हे शिवरात्रीला असते . वैधृती व व्यतिपात हे योग , भद्रा करण , अमावस्या तिथि व करिदिन हे सर्व शुभ कार्याला वाईट समजले जातात जसे विवाह , मुंज , गृहप्रवेश , नवीन कार्याची सुरुवात इत्यादी .
पंचांग कसे पहावे panchang kase pahave
करिदिन म्हणजे काय ?
करिदिन म्हणजे ज्या दिवशी पंचांगात करिदिन असे लिहिलेले असते तो दिवस . करिदिन हे सात असतात .
Good..... Amala khup chhan mahiti milali
जवाब देंहटाएंGood
जवाब देंहटाएंKhup mast mahiti milali
जवाब देंहटाएंविनायक अविनाश चंदनकर,५/५/९२,पहाटे-४.५५
जवाब देंहटाएंभाग्यश्री सुरेश नागपुरे,१०/२/९१,दुपारि-४.५५
कुंडली जुळते का ते बघायचे होते
जवाब देंहटाएंSir मला पंचांगाचा पूर्णे अभ्यास करायचा आहे तर मला कृपया प्रशिक्षण द्या
जवाब देंहटाएंMere Naam Ka Janm Patrika
जवाब देंहटाएंखुप सुंदर महत्वाची माहिती मिळाली
जवाब देंहटाएंधन्यवाद
खुप छान माहिती आहे मला पंचाग शिकायचे आहे
जवाब देंहटाएंMala chalu kalacha panchang baghaycha aslyas ky karava....mhanje maza sadhya vait Kal chalu aahe to kadhi parynt aahe kivha Montani kan sadhya Hot nani tr ky karava kadhi sampnar
जवाब देंहटाएंखुप महणजे खुपच सुंदर आहे
जवाब देंहटाएं