सीधे मुख्य सामग्री पर जाएं

navagraha stotra

 


  Navagraha Stotra नवग्रह स्तोत्र


रवि ग्रह जप मंत्र

बिज मंत्र  --- ॐ  घृणि आदित्याय नम  :   ।    

जप संख्या कमीतकमी  11000
पौराणिक मंत्र ---- जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम्   । 
तमोरिंसर्वपापध्नं प्रणतोस्मि दिवाकरम्   ।।
जप संख्या  7000

नवग्रह स्तोत्र मराठी

चंद्र ग्रह जप मंत्र

बिज मंत्र  --- ॐ  सों सोमाय नम  :   ।    
जप संख्या कमीतकमी  11000
पौराणिक मंत्र --- दधिशंखतुषाराभं  क्षीरोदार्णव-संभवम्   ।
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषनम्   ।।
जप संख्या  11000


पंचांग कसे बघावे 


नवग्रह मंत्र मराठी


मंगळ ग्रह जप मंत्र
बिज मंत्र --- ॐ  अं अंगारकाय नम  :   ।   
जप संख्या कमीतकमी  11000
पौराणिक मंत्र  --- धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम्   ।
कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम्   ।।
जप संख्या 10000

नवग्रह स्तोत्र माहिती


बुध ग्रह जप मंत्र

बिज मंत्र  --- ॐ   बुं बुधाय नम  :   ।   
जप संख्या कमीतकमी  11000

पौराणिक मंत्र ---  प्रियंगुकलिकाश्यामं रूपेणाप्रतिमं बुधम्   ।
सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्   ।।
जप संख्या 4000

मराठी स्तोत्र 


गुरु ग्रह जप मंत्र

बिज मंत्र --- ॐ  बृं बृहस्पतये नम  :   ।   
जप संख्या कमीतकमी  11000

पौराणिक मंत्र ---  देवानांच ऋषीनांच गुरुं कांचनसन्निंभम्   ।
बुध्दिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्   ।।
जप संख्या 19000



मराठी मंत्र


शुक्र ग्रह जप मंत्र

बिज मंत्र --- ॐ  शुं शुक्राय नम  :   । 
जप संख्या कमीतकमी  11000

पौराणिक मंत्र --- हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरुम्   ।
सर्वशास्त्र प्रवक्तारं  भार्गवं प्रणमाम्यहम्   ।।
जप संख्या 16000



नवग्रह स्तोत्र 


शनि ग्रह जप मंत्र

बिज मंत्र --- ॐ  शं शनैश्चराय नम  :   ।   
जप संख्या कमीतकमी  11000

पौराणिक मंत्र --- नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम्   ।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम्   ।।
जप संख्या 23000



राहु ग्रह जप मंत्र

बिज मंत्र --- ॐ  रां राहवे नम  ः   ।  
जप संख्या कमीतकमी  11000
पौराणिक मंत्र --- अर्धकायं महावीर्य  चंद्रादित्य विमर्दनम्   ।
सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम्   ।।
जप संख्या 18000


नवग्रह स्तोत्र 


केतु ग्रह जप मंत्र

बिज मंत्र --- ॐ  कें केतवे नम  :   ।  
 जप संख्या कमीतकमी  11000
पौराणिक मंत्र --- पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रह मस्तकम्   ।
रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं  प्रणमाम्यहम्   ।।
जप संख्या 17000


पौराणिक स्तोत्र 



नवग्रह स्तोत्राची रचना व्यास मुनीनी केली आहे. नवग्रह स्तोत्रामध्ये एक बिज मंत्र आहे व दुसरा पौराणिक मंत्र आहे. बिज मंत्राचा जप कमीतकमी 11000 करावयास पाहिजे . जास्तीत जास्त तुम्ही कितीही करु शकता . सध्या असे बघण्यात येते कि जी पौराणिक मंत्राची जप संख्या आहे तीतकाच बिज मंत्राचा जप केला जातो. 

जसे बुधाचा जप 4000 आहे तर तो 4000 च केला जातो. बिज मंत्र हा छोटा असल्यामुळे तो कमीतकमी 11000 तरी केला पाहिजे. पौराणिक मंत्र मात्र हा त्याची जी जप संख्या , तेवढा करावयास पाहिजे. मंत्राचा जप हा कोणाकडून करुन घेण्यापेक्षा तो जर स्वता: केलातर जास्त फायदेशीर राहिल. 

ज्या कार्यामध्ये तुमचे मन नाही ते कार्य कसे सफल होईल. आजकाल तर जपाची फॅशन निघाली असे वाटते . ज्योतिषी सांगतात म्हणुन लोक तो करुन घेतात. 

नवग्रह स्तोत्राचा जप करणारा पुरोहित खरेच तो जप करतो कि नाही किंवा तो कोणता जप करतो बिज मंत्राचा जप करतो कि पौराणिक मंत्राचा हे सर्वानी जाणुन घ्यायला पाहिजे. 

काही पुरोहित प्रामाणिकपणे जप करतात. लोकाना असे वाटते कि जप केल्याने लगेच विवाह जमतो , पैसा मिळतो  धंदा चांगला चालु लागतो , जपाचे संकल्प सोडुन तुम्ही निंवात घरात बसता तिकडे पुरोहित त्याच्या घरी जप करतो , ज्या कार्यात तुमचे मन नाही , ज्या कार्यात तुमचा सहभाग नाही ते कार्य कसे सफल होईल. 

शेवटी लोक ज्योतिषाकडे परत येतात तो परत दुसरा जप करायला लावतो. माझे असे मत आहे कि ,ठिक आहे एक वेळ जप करा , तरीही कार्य पु्र्ण झाले नाही तर देवाची भक्ती करा ,नामस्मरण करा . शेवटी जी गोष्ट ज्या वेळेस होणार आहे , त्याचवेळेस ती होईल झाडाचे फळ पिकल्याशिवाय खाली पडत नाही हे लक्षात ठेवा. मेहनत केल्याशिवाय व श्रध्दा ठेवल्याशिवाय फळ मिळत नाही .



 Navagraha Stotra नवग्रह स्तोत्र 


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

shripad shrivallabh siddha mangal stotra श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्र

shripad shrivallabh siddha mangal stotra  श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्र    बापनाचार्यलु हे श्रीपाद श्रीवल्लभ यांचे आजोबा होते. बापनाचार्यलु ह्यांना श्रीदत्तात्रयांचे दर्शन झाल्यानंतर त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्राची रचना केली.       श्रीपाद   श्रीवल्लभ   सिध्द मंगल मंत्र   श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा  ।   जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।।   श्रीविद्याधरी राधा, सुरेखा, श्रीराखीधर श्रीपादा  ।   जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।। माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा  । जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।। सत्यऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा  । जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।। सावित्रकाठक चयन पुण्यफला, भारद्वाज ऋषी गोत्र संभवा  । जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।। दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा  । जय विज...

कोणत्या राशीला साडेसाती आहे. साडेसाती म्हणजे काय Konatya Rashila Sadesati ahe. Sadesati mhanje kay

  कोणत्या राशीला साडेसाती आहे. साडेसाती म्हणजे काय Konatya Rashila Sadesati ahe. Sade sati mhanje kay कोणत्या राशीला साडेसाती सुरु आहे .  धनु , मकर व कुंभ या तीन राशीना साडेसाती   चालू आहे. 29 एप्रिल 2022 रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्यानंतर धनु राशी ची साडेसाती संपुन मकर , कुंभ व मीन राशीची साडेसाती चालु होईल. मुळात साडेसाती ही राशी प्रमाणे न बघता तुमचा जन्म चंद्र ज्या अंशात असेल तिथुन 45 अंश मागे शनि आल्यास साडेसाती सुरु होते व शनि 45 अंश पुढे निघुन गेल्यास साडेसाती   संपते.  पंचांग कसे पाहावे  साडेसाती केंव्हा सुरु होते      साडेसाती केंव्हा सुरु होते .  तुमचा जन्म चंद्र धनु 25 अंश आहे तर 25 + 45 = 70 अंश . धनु राशी चे 5 अंश + मकर राशी चे 30 अंश + कुंभ राशि चे 10 अंश असे एकूण 45 अंश पुर्ण होतात . तुमची साडेसाती शनि जेव्हां कुंभ राशीत 10 अंश जाईल तेव्हां संपेल. शनि वृश्चिक राशीत 10 अंश आल्यानंतर साडेसाती सुरु होईल . पण तुम्ही असे समजता कि वृश्चिक राशीत शनि आल्याबरोबर तुमची साडेसाती सुरु होईल पण तसे होत नाही. तुमची साडेसा...

पंचांग कसे पहावे panchang kase pahave

  पंचांग कसे पहावे Panchang kase pahave पंचांग कसे बघावे   Panchang kase pahave पंचांग कसे पहावे ?     पंचांग म्हणजे काय panchang mhanje kay   पंचांग म्हणजे पाच अंग   1.  तिथी     2. नक्षत्र    3.  योग    4. करण     5. वार .  या 5 अंगाची माहिती ज्यात असते त्याला पंचांग म्हणतात . तिथी म्हणजे शुक्ल पक्षात प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत व कृष्णपक्षात प्रतिपदेपासून अमावस्यापर्यंत रोज एक जो दिवस असतो त्याला तिथी म्हणतात . हिंदु महिन्याची सुरुवात शुक्ल पक्षापासून होते. तर काही राज्यात कृष्ण पक्षापासून होते. शुक्ल पक्षातल्या पहिल्या तिथीला प्रतिपदा म्हणतात . त्यानंतर दुसऱ्या तिथीला द्वितीया , तिसऱ्या तिथीला तृतिया व शेवटच्या तिथीला पौर्णिमा म्हणतात . कृष्ण पक्षाची सुरुवात प्रतिपदेने होते . कृष्ण पक्षात दुसरी तिथी द्वितीया , तिसरी तिथी तृतिया व शेवटची तिथी अमावस्या असते . तिथी म्हणजे सुर्य व चंद्र यांच्या मध्ये 12 अंशाचे अंतर पुर्ण झाल्यावर एका तिथीची समाप्ति होते . अमावस्येला सुर्य व चंद्र एकाच र...